- बेंटलर ऑटोमोटिव्हच्या कामगारांना 24 हजार रुपये बोनस
लोणावळा – चाकण औद्योगिक वसाहतीमधील बेंटलर ऑटोमोटिव्ह लिमिटेड कंपनी व शिवक्रांती कामगार संघटना यांच्यात नुकताच कामगारांच्या बोनसचा करार झाला. यानुसार कंपनीतील 125 कामगारांना प्रत्येकी 24 हजार 200 रुपये बोनस मिळणार असल्याची माहिती शिवक्रांती कामगार संघटनेचा संघटक प्रतीक विजय पाळेकर यांनी दिली.
सध्या कोविड महामारीमुळे उद्योग व्यावसाय बंद असल्याने अनेक कारखान्यांमध्ये कामगारांना नियमित पगार किंवा नियमित काम मिळत नसताना शिवक्रांती कामगार संघटनेने सर्व कामगारांना बोनस मिळवून दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ऍड. विजयराव पाळेकर, गुलाबराव मराठे, रवींद्र साठे, राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटक प्रतीक पाळेकर यांनी बोनसचा पहिलाचा तगडा करार करत शिवक्रांतीचा नावलौकिक वाढविला आहे.
करारावर बेंटलर ऑटोमोटिव्ह लिमिटेड कंपनीच्या वतीने सरव्यवस्थापक मुकूंद गणगणे, मनुष्यबळ विकास अधिकारी विरेंद्र गायकवाड, उत्पादन प्रमुख योगेश थोरात यांनी, तर शिवक्रांती कामगार संघटनेचे संघटक प्रतीक पाळेकर, युनीट अध्यक्ष दीपक टिळेकर, आनंदा शिंदे, पांडूरंग आहेर, सुशांत ढवळसकर, सतिष केदारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा करार यशस्वी करण्यासाठी स्थानिक कमिटीने विशेष परिश्रम घेतले.