सामाटणे – सांगवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना उन्नती फाऊंडेशन व गुरू फाऊंडेशनक्या वतीने झाडांच्या बियांचे (सिड बॅग) वाटप करण्यात आले. या सिड बॅगमध्ये वेगवेगळ्या झाडांच्या बिया देवून त्या कशा पद्धतीने लावायच्या आणि रोप वाढल्यावर कुठे आणि कसे लावायचे याची माहिती सांगण्यात आली.
या कार्यक्रमाला उन्नती फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, पी. के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, गुरू फाऊंडेशन चे संस्थापक डॉ. दीपक जोशी, सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप, भाऊसाहेब पानमंद, दशरथ राक्षे, धनंजय लिमन, शिवाजी राक्षे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा आमले, शाळेचे मुख्याध्यापक संदिप सकपाळ, आण्णासाहेब ओहोळ , माधव गुरव, उर्मिला शिरसाट, सर्व ग्रामस्थ, विध्यार्थी उपस्थित होते.
रोप लावल्यावर काही दिवस काळजी कशी घ्यायची याचेही मुलाना डॉ. जोशी यांनी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम सांगवडे ग्रामपंचायतीचे सरपंच रोहन जगताप यांच्या पुढाकाराने घेण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक संदीप सकपाळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब ओहोळ यांनी केले तर सकपाळ यांनी सर्वांचे झाडे जगवण्याचे आश्वासन देऊन आभार मानले.
जर अशा संस्था पुढे येवून प्रत्येक शाळेत गेल्या तर झाडांचे प्रमाण वाढायला मदत होईल आणि जी निसर्गामद्धे सध्या अनियमितता दिसते आहे ती दिसणार नाही. वेळेवर पाऊस पडेल, ऋतु वेळेवर सुरू होतील आणि संपतीलही वेळेवर.
संदीप सकपाळ मुख्याध्यापक जिप शाळा सांगवडे
जर वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असे आपले संत महात्मे म्हटले आहेत तर आपण त्यांच्याशी सोयऱ्यासारखे वागतो का? हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला पाहिजे. झाड लावणे सोपे आहे ते जगवणे अवघड आणि महत्वाचे आहे. जर मुलांना याचे मार्गदर्शन केले तर ते कमी का होईना झाडे लावून जगवतील.
– रोहन जगताप, सरपंच, सांगवडे ग्रामपंचायत