मुंबई – 3 जून 2013 रोजी जिया खानच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या आईने तिचा प्रियकर सूरज पांचोली याच्यावर हत्येचा आरोप केला होता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी सुरज पांचोलीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सुरज पांचोलीची सुसाईड नोटमध्ये लावण्यात आलेल्या सर्व आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जियाने आत्महत्या केल्यानंतर तिच्याकडे सापडलेली सुसाईड नोट चर्चेचा विषय ठरली होती. त्यावरूनच तिच्याशी प्रेम संबंध असलेल्या सुरज पांचोलीवर अनेक आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी अनेकदा त्याला तपासासाठी बोलवले देखील होते.
तब्बल दहा वर्षांनी या केसचा निकाल लागला असून आता सुरज पांचोलीची निर्दोष मुक्ताता करण्यात आली आहे. निर्दोष सुटका झाल्यानंतर सूरज म्हणाला की,”सत्याचा नेहमी विजय होतो”. दरम्यान, सूरज पांचोली याची निर्दोष सुटका झाल्यानंतर अभिनेत्री आणि त्याची आई जरीना वहाबने आनंद व्यक्त केला आहे. सूरज पांचोली याचे कुटुंबिय जोरदार सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सूरज पांचोली याच्या कुटुंबाकडून सर्वांना मिठाईचे वाटप केले जात आहे. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सूरज पांचोली याची निर्दोष सुटका कुटुंबियांनी मिठाईचे वाटप केले. मात्र, नेटकऱ्यांना हे अजितबत आवडले नसल्याचं दिसत आहे.
मिठाई वाटपचे फोटोवर आणि व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी पांचोली कुटुंबियांचा चांगलाच समाचार घेतलाय. एकाने कमेंट करत म्हटले की, ‘तुमच्या मुलाने काही खूप जास्त चांगले काम केलेले नाही, जे तुम्ही इतका आनंद व्यक्त करत आहेत.’ अश्या अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहे.