निगडी, (वार्ताहर) – श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल मध्ये ब्रिजस्टोन कंपनी व योजक संस्थेच्या वतीने 42 गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. पी.सी.एम.सी परिसरातील एकूण 152 गरजू विद्यार्थ्यांना ब्रिजस्टोन कंपनीच्या प्रोजेक्ट ब्रिजशाला अंतर्गत ही शिषयवृत्ती दिली जात आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत भाटनगर आणि मिलिंदनगर येथे 2 स्टडी सेंटर चालवले जात आहेत. जेथे विद्यार्थ्यांचे इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयाचे मोफत क्लास घेतले जातात.
याप्रसंगी ब्रिजस्टोन कंपनीचे नितीन अष्टेकर, जितेंद्र पाठक, रामा राव, सी. एस. आर लीड नितिका गुल्हाने, विक्रम मस्के तसेच योजक संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार व विद्यालयाचे प्राचार्यविक्रम काळे उपस्थित होते.
विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांच्या योजक संस्थेच्या वतीने गृहभेटी करून पालक मीटिंग घेण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्याआवश्यक बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योजक संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार यांनी केले. ब्रिजस्टोन कंपनीच्या वतीने नितीन अष्टेकर , नितिका गुल्हाने यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन स्नेहल भूते, चैताली बोरोले, स्वप्ना बोधनी, समिना सय्यद यांनी केले.