मोशी, (वार्ताहर) – डुडुळगाव येथील देहू फाट्यावर महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावगाड्यातील संस्कृती जोपासण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आळंदी येथील शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या प्रयत्नातून व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी निर्मला कुंभकर्ण, मनीषा सातपुते, मीना वाडेकर, शीतल ढवळे, आरेफा खान, रोशनी सय्यद, जनाबाई काशिद, सरस्वती खोडसे, सायरा शेख, सरस्वती गिरी, महेक शेख, सुरेखा बहीर, संगीता चव्हाण, सुनीता जाधव, बबिता शिंदे, ललिता हळदे, अश्विनी ननावरे, जयश्री आल्हाट, रेश्मा फुले, श्रावणी महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, श्री साई महिला बचत गट, श्री समर्थ महिला बचत गट उपस्थित होते.