ट्विटरवर दिशा पटानी ठरली टॉप

मुंबई : बॉलीवूडमधील तीन अभिनेत्रींची ट्विटरवरची लोकप्रियता सध्या चर्चेचा विषय आहे. यात दिशा पटानी ट्विटरवरील टॉपची अभिनेत्री ठरली आहे. लोकप्रियतेमध्ये तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. ही आकडेवारी स्कोर ट्रेंड्‌स इंडियाने प्रसिद्ध केली आहे.

स्कोर ट्रेंड्‌स इंडियाने दिलेल्या यादीत 100 अंकांसह दिशा पटानी पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. 98 अंकासह प्रियांका दुसऱ्या, तर दीपिका पादुकोण 84 अंकासह तिसऱ्या स्थानावर आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्‌स इंडियाने प्रमाणीत केली आहे.
दरम्यान, दिशा पटानीला युवा वर्गाने सर्वाधिक पसंती दर्शविली आहे.

तिच्या कोणत्याही पोस्टवर तरुणवर्ग तुटून पडतो. तिच्या पोस्टवरच्या रिऍक्‍शन बघता आगामी काळात दिशाची लोकप्रियता आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. याशिवाय दिशा तसेच प्रियांका चोप्राच्या ट्विटरवर ग्लोबल इंटरेक्‍शन वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या जेएनयू प्रकरणामुळे दीपिका पादुकोणही ट्विटरवर चर्चेत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here