- बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
देहूरोड – कॅंटोन्मेंट भागातील नागरिकांना विविध केंद्रीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे थेट ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देशाची पत्रिका कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅंटोन्मेंट बोर्डांच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना केंद्रातील कल्याणकारी योजना थेट मिळावा, योजनांचा लाभ विना अडथळा घेता यावा व मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपूर्वी देशातील 62 कॅंटोन्मेंट बोर्डाचे ऑनलाइन पद्धतीने आढावा घेतला होता.
आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अल्पसंख्यांकांसाठी प्री म्याट्रिक आणि पोस्ट म्याट्रिक शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण, विकलांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, एलएसडीएम वर्कर प्री मॅट्रिक व पोस्ट म्याट्रिक शिक्षणासाठी अर्थसाह्य, एस. टी. विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय फेलोशिप व शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय मेरिट शिष्यवृत्ती योजना, केंद्रीय पातळीवरील महाविद्यालयीन व विद्यापीठ शिष्यवृत्ती, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, विकलांग विद्यार्थ्यांसाठी प्री म्याट्रिक व पोस्ट म्याट्रिक शिष्यवृत्ती योजना अशा एकूण 16 कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे कॅंटोन्मेंटने जाहीर सूचना नागरिकांच्या माहितीसाठी बोर्डाच्या संकेतस्थळी प्रसिद्ध केले आहे.