जामखेड: रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी हिवाळी सत्र 2019 मध्ये घेतलेल्या बीएचएमएस प्रथम व द्वितीय परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत चि. दीपेश पांडव, कु. सायली नेवसे व कु.स्नेहा चव्हाण अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून बीएचएमएस द्वितीय परीक्षेत कु.स्नेहल चिंचकर ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्करराव मोरे पाटील व सचिव डॉ सौ. वर्षा मोरे पाटील यांचे सह होमिओपॅथिक कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती डॉ. राजेस्वरी रापता, डॉ. निर्मला ओव्हल आदींनी अभिनंदन केले आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून जामखेड येथे होमिओपॅथिक महाविद्यालय सुरू करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची महाविद्यालयाची तिसरी बॅच आहे. संस्थेमार्फत होमिओपॅथिक महाविद्यालयसह,फार्मसी पदवी व पदविका अभ्यासक्रम तसेच नर्सिंग पदवी व पदविका अभ्यासक्रम सुर करण्यात आलेले आहेत.