पुणे: डीएसके प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे, असा अर्ज 32 हजार गुंतवणूकदार आणि 51 याचिकार्त्यांच्या वतीने अॅड.चंद्रकांत बिडकर यांचा न्यायालयात अर्ज. चंद्रकांत बिडकर यांनी नुकताच विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. आजच्या तारखेपासून सहा महिन्यांत जलद गतीने हे प्रकरण निकाली काढण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
या प्रकरणात डीएसकेंसह 13 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. आरोपींनी विविध बॅंकांकडून 1 हजार 374 कोटी रुपये कर्ज घेतले आहे. तर, ठेवीदारांचे 1 हजार 153 कोटी रुपये आहेत. फ्लॅटधारकांकडून मोठी रक्कम घेण्यात आलेली आहे. ठेवीदारांची ठेव तर अडकलीच आहे. या ठेवींवर 2017 पासून व्याज देण्यात आलेले नाही. आरोपीच्या चल आणि स्थिर मालमत्ता सरकारने जप्त केल्या आहेत. त्या मालमत्ता आरोपीने ताबा न दिल्याने लिलावात काढण्यास अधिकारी असमर्थ ठरत आहेत.
गुंतवणूकदारांचे व्याजाचे 415 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांनी आरोपींना प्रकरण शांततामय मार्गाने मिटवून देण्याची संधीही दिली. मात्र, हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आतापर्यंत 23 गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला आहे. तर, गुंतवणूकदरांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर ही रक्कम गुंतवली आहे. त्यांना लवकरात लवकर रक्कम परत मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा अर्ज केला आहे. न्यायालयाने तो अर्ज दाखल करून घेतला आहे. त्यावर सरकारी पक्षाला म्हणणे मांडण्यास सांगितल्याचे अॅड.चंद्रकांत बिडकर यांचा न्यायालयात अर्ज. चंद्रकांत बिडकर यांनी सांगितले.