मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या स्टंटवर आधारित शो ‘खतरों के खिलाडी’ साठी ओळखला जातो. रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी 13’ घेऊन येत आहे. ज्याचा खुलासा त्याने बिग बॉस 16 च्या फिनालेमध्ये केला होता. ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या सीझनमुळे रोहित खूप चर्चेत आहे.
बिग बोस विनर शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’ सीझन 13 चा पहिले स्पर्धक म्हणून फायनल झाला आहे. या शोमधून शिव मोठी कमाई करणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. रोहित शेट्टीच्या शोमध्ये शिवची फी किती असेल माहिती नसले तरी आता अशी चर्चा आहे की. शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून शिव ठाकरे एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेत आहेत.
शिव ठाकरे खतरों के खिलाडी या शोमध्ये एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेत असल्याची बातमी आली आहे. रिपोर्टनुसार,एक एपिसोडनुसार शिव ठाकरे 5 ते 8 लाख रुपये कमवणार. बिग बॉसचा हा स्टार शोमधून दर आठवड्याला 10 ते 16 लाख रुपये घेतो.
खतरों के खिलाडी या शोमध्ये अभिनेता करण आणि एरिका फर्नांडिस यांचीही नावे समोर आली आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाचे शूटिंग मे महिन्याच्या मध्यावर केले जाणार आहे. जे 55 ते 60 दिवस केले जाईल. गेल्या वर्षी ‘खतरों के खिलाडी’ 2 जुलै 2022 रोजी सुरू झाला होता, अशा परिस्थितीत यावेळेसही हा शो जुलैमध्येच सुरू होईल असे देखील सांगण्यात आलं आहे.