दिघी, पुणे – करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांनाही लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. अधिकृत कोविड लसीकरण केंद्र विघ्नहर्ता साई हॉस्पिटल येथे परिसरातील नागरिकांसाठी कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत.
18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार असून त्यासाठी Cowin.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. पहिला डोस झाल्यानंतर नागरिक 84 दिवसांनी दुसरा डोस घेऊ शकतात. स्लाॅट बुक करताना 411015 हा पिनकोड टाकून PCMC Vighanaharta sai Hospital चा पर्याय निवडावा.
लशीसाठी नोंदणी कशी करायची?
कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा. वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल. त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल. पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल. तुम्ही जिल्हावार यादीही शोधू शकता. तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.