प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -करोना प्रतिबंधक कोविशील्ड लशीचा तुटवडा अद्याप कायम असून, मंगळवारी पाचच केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. मागील आठवड्यात या लशींचा तुटवडा भासल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला होता. मात्र ही स्थिती अद्याप पूर्ववत नसून, लशींचा साठा कमीच आहे. त्यामुळे महापालिकेने मंगळवारी केवळ पाच केंद्रांवरच कोविशील्ड लसीकरणाचे नियोजन केले आहे.
15 जुलै पासून बुस्टर डोस मोफत देण्याला सुरूवात केल्यानंतर 68 केंद्रांवर त्याचे नियोजन करण्यात आले होते. नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळत होता. मात्र मागणी वाढल्यामुळे डोसचा तुटवडा निर्माण झाला.
पाच लसीकरण केंद्रे
कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द
कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड
कै. अण्णासाहेब मगर रुग्णालय, हडपसर