न्यूयॉर्क :- भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला डायमंड लीग स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली. या स्पर्धेत त्यानं 83.80 मीटर अंतर नोंदवत तिसरा क्रमांक मिळवला. चेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेच याने 84.24 मीटर अंतर नोंदवताना विजेतपद मिळवले तर फिनलंडचा ऑलिव्हर हेलॅंडरने 83.74 मीटर अंतर नोंदवताना तिसरा क्रमांक मिळवला.
ही स्पर्धा अमेरिकेतील ओरेगॉन येथे पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर अंतर पार करू शकला. विजेत्या ठरलेल्या जेकबने पहिल्याच प्रयत्नात 84.1 मीटर अंतर पार केले होते. तर त्याने सहाव्या प्रयत्नात 84.27 मीटर अंतर पार करत विजेतेपदही मिळवले.
डायमंड लीग जिंकणारा तिसरा खेळाडू ठरण्याची नीरजला संधी होती. यापूर्वी चेक प्रजासत्ताकच्या विटेझस्लाव्ह वेसेली याने 2012 व 2013 साली तर यंदा विजेतेपद मिळवलेल्या जेकबने 2016 व 2017 साली ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी नीरजने ही स्पर्धा जिंकली होती.
दोहा येथे यंदा झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने 88.67 मीटर अंतर पार केले होते. तसेच लॉसने येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत 87.66 मीटर अंतर नोंदवले होते. झुरिचला झालेल्या याच स्पर्धेत त्याला 85.71 मीटर अंतर नोंदवता आले होते व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.