मोस्को – मागील काही आठवड्यांपासून क्रेनवर विजय मिळविण्याचा विचार करणाऱया रशियाला महिन्याभरापासून निकराच्या प्रतिकारामुळे पिछेहाट सहन करावी लागलत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक रशियाच्या सैन्याच्या विरोधात युक्रेनने कडवी झुंज दिली आहे.
रशियाच्या दोन सैन्य कमांडरांचे संभाषण समोर आले आहे. यात ते युक्रेनसोबतचे युद्ध ‘चेचन्याच्या लढाई’पेक्षाही अधिक अवघड असल्याचे म्हणत आहेत. रशियन सैन्य कमांडरांचे सॅटेलाइट रेडिओ-सॅटवर झालेले संभाषण समोर आले आहे. काळय़ा समुद्रानजकी युक्रेनचे शहर मीकोलाइव्हच्या आघाडीवर तैनात एक रशियन सैन्याधिकारी आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱयामधील संभाषण उघड झाले आहे. या संभाषणात युक्रेनमधील युद्धाची वस्तुस्थिती ‘चेचन्याच्या लढाई’पेक्षाही बिकट असल्याचे म्हटले गेले. ‘जीव गमाविणाऱया रशियाच्या सैनिकांचे मृतदेह देखील मिळविता येत नाहीत’ असे या अधिकाऱयाने संभाषणादरम्यान म्हटले होते. त्यांचे हे संभाषण रशियन भाषेत आहे. दिमित्री एल्परोविच यांनी हे संभाषण सार्वजनिक केले आहे. दिमित्री हे मूळचे रशियन असून सध्या अमेरिकेत राहत आहेत.
यासाठी रशियाला युक्रेन महत्त्वाचाच
“रशिया जे धोरण अवलंबत आहे त्याचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या देशांच्या सीमेजवळ एक धोकादायक लष्करी आघाडी निर्माण होत असल्याचं दिसत आहे.याचबरोबर 12 जुलै 2021 ला युक्रेनबरोबरच्या संबंधांबाबत विस्तृत लेखामध्ये व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचा शेजारी देश एका धोकादायक खेळात सहभागी होत असल्याचं म्हटलं होतं. युक्रेन युरोप आणि रशियामध्ये अडथळा ठरत असल्याचं त्यांनी त्यात म्हटलं होतं.