अमेरिकन डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. याउलट बेस मेटल आणि कच्च्या धातूंना आणखी आधार मिळाला. अमेरिकी तेलसाठ्यात घट झाल्याने तसेच ओपेक व सदस्यांनी सातत्याने उत्पादन कपात केल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले. चीन या जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक धातूंच्या ग्राहकाकडून मागणीत भरपूर वाढ झाल्याने तांब्याचे दर वाढले असल्याचे दिसून येते.
सोने : कोविड-19 लसीमुळे पिवळ्या धातूवर परिणाम होत त्याचे दर काहीसे म्हणजे 0.12% नी घसरले व ते 1805 डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. दरम्यान, अमेरिकेतील रोजगारात अचानक वृद्धी झाल्याच्या दाव्यांमुळे या घसरणीवर मर्यादा आल्या. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील कामगार बाजारावर साथीचा सातत्याने परिणाम होत असून अनेक लोक बेरोजगारीचे दावे करत आहेत.
जागतिक मध्यवर्ती बॅंका अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणेसाठी व्याजदर कमीच ठेवण्याचा अंदाज आहे. त्यामुळेही सोन्याला आधार मिळाला. ज्यो बायडेन यांच्या हस्तांतरणासह, कोविड-19 लसीच्या आशेमुळे पिवळ्या धातूचे दर आणखी काही प्रमाणात घसरले.
कच्चे तेल : अमेरिकी क्रूडसाठ्यात घसरण झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडने 1.8 % ची वृद्धी घेतली व ते 45.7 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. करोनाशी लढणाऱ्या लसीच्या आशेमुळे या दरांना आणखी आधार मिळाला. यू.एस. एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड स्टॉकपाइल्स 745,000 टनांनी वाढले.
आगामी काही महिन्यांमध्ये ओपेक आणि सदस्यांकडून क्रूड उत्पादन कपातीचा अंदाज आहे, त्यामुळे तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला. घसरते तेलमार्केट आणि कमकुवत मागणी यामुळे ओपेक व सदस्यांकडून जानेवारी 21 पर्यंत उत्पादन कपात मागे घेतली जाईल, असा अंदाज आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये अमेरिका व युरोपमधील आर्थिक कामकाजात वाढ झाल्यानेही तेलाच्या दरांना आधार मिळाला तसेच बाजारात सकारात्मक भावना वाढीस लागल्या.
बेस मेटल्स : नजीकच्या काळात बेस मेटल्समधील मागणीच्या चिंतेमुळे एलएमईवर धातूने संमिश्र संकेत दर्शवले. करोना विषाणूचा विविध जागतिक अर्थव्यवस्थांमधील वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीच्या आशावादानंतरही निरुत्साह दिसून आला. त्यामुळे बेस मेटल्सचे दर घसरले.
वर्ल्ड स्टील असोसिएशनने जागतिक क्रूड स्टील उत्पादन ऑक्टोबर 2020 मध्ये 162 दशलक्ष टन झाल्याचे नोंदवले. मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा हे 7 टक्के जास्त झाले. कारण चीनबाहेरील उत्पादन प्रक्रियांमध्ये सुधारणा झाली. इंटरनॅशनल लीड व झिंक स्टडी ग्रुपच्या अहवालानुसार, ग्लोबल झिंक मार्केट सप्टेंबर 2020 मध्ये 33,100 टन एवढ्यावर होते.
तांबे : चीनमधून लाल धातूच्या वाढत्या मागणीमुळे एलएमई कॉपरचे दर 0.10 टक्क्यांनी वधारले व ते 7,300 डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन झाल्यानेही दरांना आधार मिळाला. तथापि, जगात झपाट्याने वाढणाऱ्या करोना विषाणूच्या रुग्णांमुळे लाल धातूच्या मागणीबाबतही चिंता आहे. त्यामुळे धातूच्या नफ्यावर मर्यादा आल्या.
मॉडर्ना, फायजर तसेच ऍस्ट्राझेनिका या कंपन्यांनी साथीविरोधात लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत प्रगती असल्याचे नोंदवले. कोविड-19 वरील संभाव्य लसीच्या आशेमुळे भविष्यात तांब्याच्या मागणीत वाढ होईल.
एकूणच अर्थव्यस्था वाढू लागल्यानंतर उद्योगांत धातूचा वापर वाढत असतो. त्यामुळे विविध देशाचे विकास दर वाढू लागल्यानंतर धातूचे दर वाढतात आणि या कंपन्याच्या शेअरच्या भावातही वाढ होत असते. त्यामुळे आगामी काळात धातू क्षेत्रातील गुंतवणूकही वाढू शकते.
– प्रथमेश माल्या