चिंबळी – चिंबळी परिसरातील कुरुळीसह विविध भागांमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने या परिसरात विविध उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून खेड तालुक्यात या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरात विविध ठिकाणी हिरवेगार गवत उगवले आहे. त्यामुळे येथे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाला आहे.
यामुळे सर्दी, खोकला, ताप आदी आजार वाढले आहेत. त्यामुळे या भागातील ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्याची गरज आहे. गेल्या महिन्याभरापासून कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव, चिंबळी, मरकळ, सोळू, धानोरे, चऱ्होली खुर्द या परिसरात मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.