मुंबई : सुप्रसिद्ध गायक सोनू निगम कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे दुबईत कुटुंबासोबत अडकले आहेत. स्वत: सोनू निगम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. मात्र, सोनू निगम एका जुन्या वादामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
सुमारे तीन वर्षांपूर्वी सोनू निगम यांनी अजानबद्दल ट्विट केलं होत. त्या ट्विट प्रकरणी काही नागरिक निगम यांना प्रश्न विचारत आहेत. तुम्ही दुबईत अडकले आहेत तर, तुम्हाला तिथं अजानचा त्रास होत नाही का? असा प्रश्न मोहम्मद मझर या नेटकऱ्याने त्यांना ट्विट करून विचारला आहे.
सोनू निगम यांनी तीन वर्षांपूर्वी केल्या ट्विटचा स्क्रिनशॉट सोशल माध्यमावर व्हायरल होत असून काही नागरिक त्यांच्या अटकेची मागणी करता आहेत. सोनू निगम यांना भारतात अजानमुळे त्रास होत होता. त्यांना झोपसुद्धा येत नव्हती. मात्र लॉकडाऊनमुळे ते दुबईत आहेत तर, दुबई पोलिसांनी त्यांच्या समस्येचे समाधान करायला हवं. असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सोनू निगम यांनी तीन वर्षांपूर्वी अजानबद्दल काही ट्विट केले होते, त्यामुळे खळबळ उडाली होती. या गदारोळानंतर सोनू निगम यांनी त्यांचे ट्विटर अकाउंटही डिलीट केल होतं. या ट्विटमध्ये सोनू निगम म्हणाले होते, ‘मी हिंदू आहे, पण तरीही मला अजानच्या आवाजाने सकाळी उठावं लागत. भारतातील धर्मांची जबरदस्ती संपायला हवी. असं ट्विट त्यांनी केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता.