मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण ही बॉलीवूडमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री मानली जाते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच दीपिकाने तिचे काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
दीपिकाने शेअर केलेल्या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर सुंदर गोल्डन कलरची डिझाईन उठून दिसत आहे. या फोटोमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र दीपिकाने हा लुक अभिनेता सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलच्या लग्नासाठी केला होता.
Ranveer Singh and Deepika Padukone spotted at Karan Deol’s wedding reception 😍♥️ pic.twitter.com/h1e5S5UCeG
— Ranveer Singh TBT (@Ranveertbt) June 18, 2023
करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत दीपिकासह रणवीर सिंगनेही हजेरी लावली होती. त्यासाठी दोघांनी खास लुक केला होता. रणवीरने सुंदर क्रीम कलरची शेरवानी परिधान केली होती. दोघांच्या या लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचे या रिसेप्शन पार्टीतील काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.