नवी दिल्ली – अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाबाबत बैठक चालू असतानाच जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले.
त्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचा दर 297 रुपयांनी कमी होऊन 47,019 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दर 556 रुपयांनी कमी होऊन 59,569 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,769 डॉलर व चांदीचा दर 21.92 डॉलर प्रति औंस झाला. एचडीएफसीचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेच्या पतधोरणानंतर बाजाराला दिशा मिळेल.