नगर – नागापूर गावठाणमध्ये फवारणी करत असलेल्यांनी दलित वस्तीमध्येही औषध फवारणी करावी अशी विनंती केली. परंतु त्यांनी अपशब्द वापरत लोकांचा एवढा कळवळा असेल तर हाताने फवारणी करा असे उद्धट उत्तर दिले.
तसेच हाताला धरुन शिवीगाळ करत ढकलून दिले. हे दीर निलेश भाकरे यांनी पाहिले. निलेश सजून सांगायला आले असता त्या कर्मचाऱ्यांनी दिराची गचंडी पकडून तोंडात मारली. त्यामुळे वाद झाला आहे. परंतु, राजकीय पदाधिकारी याला वेगळे वळण देत असून, साजासाठी काम करणारे गुंड असतात तर हे आरोप करणारे कोण आहेत, असा सवालही नगरसेविका रिता भाकरे यांनी केला आहे. दरम्यान पोलीस देखील आमची फिर्याद घेत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.