आईनेच केला लेकीचा खून

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नगर (प्रतिनिधी)– नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी घडली होती. मात्र, आईनेच लेकीला विहीरीत टाकुन जीवे ठार मारले असल्याची माहिती पोलीस तपासातुन समोर आली आहे. याबाबत मयत आई विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयत आरोपी निता ऊर्फ कविता सचिन पालवे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, धनगरवाडी येथील नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- 27, रा. धनगरवाडी ता.नगर), व मुलगी प्रणाली सचिन कापडे (वय- 4) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि.28) रोजी रात्री नीता कापडे व मुलगी प्रणाली यांनी स्वतःच्या घराला कडी लावून घराबाहेर पडल्या.

सकाळी दोघी मायलेकी निदर्शनास आल्या नाही. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध केली असता, जवळच पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एक विहिरीमध्ये दोघींचे मृतदेह आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, आईने कोणत्यातरी गोष्टीचा राग मनात धरून मुलीला विहिरीत टाकून तीला जीवे ठार मारले, व स्वत: विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहायक फौजदार श्रीधर पालवे यांनी फिर्याद दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here