मुंबई – ‘बाहुबली’ला मिळालेल्या अफाट यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसह आलिया भट्ट आणि अजय देवगण झळकणार आहेत.
हा चित्रपट सर्वप्रथम जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु त्याची रिलीज डेट पोस्टपॉन करण्यात आली होती. यानंतर ‘आरआरआर’ 7 जानेवारी 2022 ला रिलीज होणार होता. पण पुन्हा एकदा त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
Keeping the best interests of all the involved parties in mind, we are forced to postpone our film. Our sincere thanks to all the fans and audience for their unconditional love. #RRRPostponed #RRRMovie pic.twitter.com/JlYsgNwpUO
— RRR Movie (@RRRMovie) January 1, 2022
‘आरआरआर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्वीट शेअर करत त्यांनी लिहिले आहे की.. “प्रेक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे”.
दरम्यान, हा चित्रपट नेमकता कधी प्रदर्शित होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच याबाबत सुद्धा आम्ही माहिती देऊ. असं या पोस्ट मध्ये सांगितलं आहे.