मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवा रेकॉर्ड केला असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतात चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
View this post on Instagram
‘२०२१ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट. या चित्रपटाने जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०२२मध्ये देखील चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा आहे’ या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.
‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने जवळपास २३.२३ कोटी रुपये कमावले आहेत.