अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने तिच्या चित्रपट प्रवासाबद्दल वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणाने संवाद साधला. अभिनेत्रीने आमिर खानच्या दंगल या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिने सांगितले की, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती एका शाळेत डान्स शिकवायची.
पण हा तिचा प्लॅन बी होता, कारण तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण कधी कोणाला सांगितले नाही. यासोबतच सान्याने दंगल चित्रपटामधील तिच्या प्रवासाविषयीही सांगितले.
सान्या ही बिगर फिल्मी पार्श्वभूमीची आहे. अशात बॉलीवूड इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्याच्या अनेक गोष्टी तिने केल्या. दंगल ते जवान आणि तिच्या आगामी चित्रपटांबद्दल सान्या बोलली. तिच्या चित्रपट प्रवासाबद्दल बोलताना सान्या म्हणाली,’मी पटपडगंजची आहे. माझे लहानपणापासूनचे अभिनेत्री होण्याचे हे स्वप्न मी मूकपणे पाहत होते.’
‘कुणी विचारलं नाही म्हणून सांगितलं नाही. जेव्हा मी शाळा पूर्ण केली तेव्हा मला वाटले की मी आता अभिनय करू शकते. पण तेव्हा आई म्हणायची, आधी ग्रॅज्युएशन कर मग दुसरं काही कर. मी केलं, मग आई म्हणाली पोस्ट ग्रॅज्युएशन कर. मी म्हणाले नाही, पुरे आता मी फक्त अभिनयच करणार आहे. मला जेव्हा मी दंगल सारख्या चित्रपटापासून सुरुवात केली, त्यावेळी अनेकांनी मला मुलगा समजले होते. बरेच लोक ढकलून निघून जायचे.’ असेही तिने सांगितले आहे.