राहुरी, (प्रतिनिधी)- दक्षिणात्य चित्रपटात दाखवतात, त्याप्रमाणे हत्यारे बनवलेल्या दोन युवकांना राहुरी पोलीस पथकाने आज राहुरी महाविद्यालय परिसरात पकडले. आरोपी अजित संभाजी शिंदे (वय 19, रा. समर्थनगर), विठ्ठल माणिक गरजे (वय 22, रा. कामगार कॉलनी, रा.राहुरी फॅक्टरी, ता.राहुरी) यांना शस्त्रासह पकडले. त्यांना अटक करत शस्त्रे जप्त केली.
राहुरी येथे शाळा, कॉलेज परिसरामध्ये काही युवक हे विद्यार्थिनींना त्रास व्हावा, या उद्देशाने असभ्य वर्तन करत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. सहा असभ्य वर्तन करणाऱ्या युवकांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर कारवाई केली. पैकी दोघांनी दाक्षिणात्य चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे बनवलेले हत्यार त्यांचे राहते घरातून काढून दिले. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार तुळशीराम गिते करीत आहेत.