वाघोली – पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी आव्हाळवाडीचे (ता. हवेली) माजी उपसरपंच तथा वाघोलीतील ज्येष्ठ नेते दादासाहेब सातव यांची निवड करण्यात आली आहे.
खासदार गिरीश बापट, माजी मंत्री संजय भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, संघटनमंत्री रवी अनासपुरे, पुणे जिल्हा प्रभारी योगेश गोगावले, जालिंदर कामठे, आमदार राहुल कुल, रोहीदास उंद्रे, प्रवीण काळभोर, सुनील कांचन, संदीप सातव, चित्तरंजन गायकवाड, जयप्रकाश सातव, सुदर्शन चौधरी, पुनम चौधरी, गणेश कुटे आदींच्या उपस्थितीत दादासाहेब सातव यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
हवेली तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातव यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीवर देखील सातव यांनी कामकाज पाहिले आहे.
हवेली तालुक्यातील भाजपमधील एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी पालकमंत्री गिरीश बापट यांचे ते निकटर्तीय आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे दादासाहेब सातव यांनी सांगितले.