#CWC23 #SAvNED Match Updates :- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेदरलँड्सची फलंदाजी सुरू झाली आहे. पावसामुळे सामन्यास विलंब झाला असून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने हा सामना 43-43 षटकांचा करण्यात आला आहे. दोन्ही डावातून सात षटकं कमी करण्यात आले आहेत.
हा सामना 43-43 षटकांचा असेल. पहिला पॉवरप्ले एक ते नऊ षटकांचा असेल, पुढील पॉवरप्ले 10-35 षटकांचा असेल आणि अंतिम पॉवरप्ले 36-43 षटकांचा असेल. तीन गोलंदाज जास्तीत जास्त नऊ षटके टाकू शकतात, तर दोन गोलंदाज जास्तीत जास्त आठ षटके टाकू शकतात.
धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यापूर्वी पावसाने थैमान घातले आणि नाणेफेक(Toss) थोड्या विलंबानंतर घेण्यात आली. पावसामुळे टाॅस एक तास उशिराने म्हणजेच दुपारी 2.30 वाजता झाला. मॅच तीन वाजता सुरु करायची योजना होती, पण नाणेफेकीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला तो 3 वा 24 मिनिटांनी थांबला.
SA vs NED Live Score : त्यानंतर मग पाऊस थांबल्यानंतर अन् मैदान सुकावल्यानंतर सामना दुपारी 4 वाजता सुरू करण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नेदरलँड्स संघाच्या 10 षटकांत 2 बाद 32 धावा झाल्या आहेत. सध्या क्रीजवर कॉलिन अकरमन4*(13) आणि बास डी लीडे 2*(6) खेळत आहेत.
22 धावांवर नेदरलँड्स संघाची पहिली विकेट पडली. विक्रम 16 चेंडूत दोन धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला हेन्रिक क्लासेनकरवी झेलबाद केले. रबाडाची वनडेतील ही 150वी विकेट होती. त्यानंतर लगेचच 24 धावांच्या स्कोअरवर नेदरलँड्सची दुसरी विकेट पडली. मॅक्स ओ’डॉड 25 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. मार्को जॅनसेनने त्याला क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले.
SA vs NED दोन्ही संघ खालीलप्रमाणे :-
नेदरलँड्स:- विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
दक्षिण आफ्रिका:- क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.
दरम्यान,विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून मंगळवारी नेदरलँड्सवर शानदार विजय नोंदवून आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे नेदरलँड्सने 2022 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत वर्ल्ड कपमधून बाहेर काढले होते.याचा फायदा पाकिस्तानी संघाला झाला आणि पाक संघाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे आफ्रिकेनं नेदरलँड्सला कमी लेखणे चूक ठरेेल.