World Cup 2023 South Africa vs Netherlands : एकदिवसीय विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँड्सशी होत आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे हा सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने 43 षटकात आठ गडी गमावून 245 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 43 षटकात 246 धावा कराव्या लागतील.
पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात नेदरलँडची सुरुवात खराब झाली. निम्मा संघ 82 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर कर्णधार एडवर्ड्सने तळाच्या फलंदाजांसोबत उत्कृष्ट भागीदारी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. नेदरलँड्सकडून कर्णधार चार्ल्स एडवर्ड्सने 69 चेंडूत नाबाद 78 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. याव्यतिरिक्त व्हॅन डर मर्वेने 19 चेंडूत 29 आणि आर्यन दत्तने 9 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या.
A comeback of the highest order.🔥
Hope the bowlers carry the momentum in the defence of this score. 🤞#SAvsNED #CWC23 pic.twitter.com/t1p3NfQSJN
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) October 17, 2023
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जेराल्ड कोएत्झी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने हा सामना 43-43 षटकांचा करण्यात आला आहे. दोन्ही डावातून सात षटकं कमी करण्यात आले आहेत. हा सामना 43-43 षटकांचा असून पहिला पॉवरप्ले एक ते नऊ षटकांचा असेल, पुढील पॉवरप्ले 10-35 षटकांचा असेल आणि अंतिम पॉवरप्ले 36-43 षटकांचा असेल. तीन गोलंदाज जास्तीत जास्त नऊ षटके टाकू शकतात, तर दोन गोलंदाज जास्तीत जास्त आठ षटके टाकू शकतात.