ICC ODI World Cup 2023 Netherlands vs Afghanistan :
विश्वचषकाच्या 34व्या सामन्यात अफगाणिस्तानसमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे.
नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकली. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विकेटवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा वरचष्मा असतो.
एडवर्ड्सने संघात एक बदल केला आहे. सलामीवीर विक्रमजीत सिंगच्या जागी वेस्ली बॅरेसीचा संघात समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनेही एक बदल केला. नवीन उल हकच्या जागी नूर अहमदला संधी मिळाली आहे.
NED vs AFG : दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे :-
नेदरलँड्स: वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन एकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (wk/c), बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगान व्हॅन बीक, रोलोफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नूर अहमद.
अफगाणिस्तानचा संघ सहा सामन्यांत तीन विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. चौथ्या विजयावर त्यांची नजर आहे. त्याचबरोबर नेदरलँड्सने सहा पैकी दोन सामने जिंकले असून आठव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांना अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.