World Cup 2023 England vs Sri Lanka Live Score : विश्वचषकाच्या 25व्या सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडची अवस्था खराब आहे. 17 षटकांत केवळ 85 धावांवर त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. या सामन्यातही कर्णधार जोस बटलरची बॅट चालली नाही. 15व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. बटलरला लाहिरू कुमाराने यष्टिरक्षक कुसल मेंडिसच्या हाती झेलबाद केले. इंग्लिश कर्णधाराने सहा चेंडूत आठ धावा केल्या.
Spectacular Mendis catch removes Buttler 🤯
This Lahiru Kumara wicket is one of the moments that could be featured in your @0xFanCraze Crictos Collectible packs!
Visit https://t.co/8TpUHbQikC to own iconic moments from the #CWC23 pic.twitter.com/2v3bxZDZTb
— ICC (@ICC) October 26, 2023
त्याच्यानंतर फलंदाजीला आलेला लियाम लिव्हिंगस्टोनही अपयशी ठरला. लिव्हिंगस्टोन सहा चेंडूत एक धाव काढून बाद झाला. 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुमाराने त्याला एलबीडब्ल्यू केले. कसून राजिथाने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टो 31 चेंडूत 30 धावा करून धनंजय डी सिल्वाकरवी झेलबाद झाला.
England lose 4 wickets for 77 runs after 15 overs. Sri Lankan bowlers are bringing the pressure! 👊🦁 #LankanLions #SLvENG #CWC23 pic.twitter.com/hzWdkdjUfp
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 26, 2023
जो रूट धावबाद…
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट धावबाद झाला. 10व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याला एक धाव घ्यायची होती. रुट त्याच्या क्रीजच्या पुढे गेला होता. नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या जॉनी बेअरस्टोनेही काही पावले पुढे केली पण तो थांबला. त्याने रूटला परतण्यास सांगितले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुटने 10 चेंडूत तीन धावा केल्या.
श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने इंग्लंडविरुद्ध संघाला पहिले यश मिळवून दिले. मॅथ्यूजने डावाच्या सातव्या आणि पहिल्याच षटकात दाविद मलानला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकरवी झेलबाद केले. मलानने 25 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. मॅथ्यूज या विश्वचषकात पहिला सामना खेळत आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.