बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाकडे सध्या अनेक बिग बजेट चित्रपटांची रांग लागली आहे. यासोबतच त्याचे अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत असून, “डॉक्टरजी’ची रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे.
आता आयुष्मान खुरानाच्या आगामी रोमॅंटिग ड्रामा असलेल्या “चंडीगड करे आशिकी’चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबत वाणी कपूर मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. या ट्रेलरची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या टीझरमध्ये आयुष्मान आणि वाणी कपूर हे किस करताना दिसत आहेत. हा टीझर शेअर करत आयुष्मानने पोस्ट केली की, “ही आशिकी जरा हटके आहे. ट्रेलर आऊट ऑन 8 नोव्हेंबर आणि 10 डिसेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेमात पडण्यासाठी राहा सज्ज.’
या चित्रपटात आयुष्मान खुराना हा एका ऍथलीटची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात त्याच्यासोबत वाणी कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. अभिषेक कपूर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यांची पत्नी प्रज्ञा कपूर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.