महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने अनेक सामन्यांमध्ये शानदार खेळी केली. त्याने आपल्या दमदार फलंदाजीने भारतासाठी अनेक सामने जिंकले आणि अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.
यावेळी रोहित शर्मा आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहित शर्माची जादू आयपीएलच्या गेल्या तीन मोसमात चालू शकली नसली, तरी यावेळी पुनरागमन करून संघाला अंतिम फेरीत नेण्याचे त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आपल्या मेहनतीच्या जोरावर रोहित शर्माने मोठा क्रिकेटपटू बनण्याचा, कर्णधार होण्याचा प्रवास केला. आज रोहित शर्मा लक्झरी लाइफ जगतो हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे. एका खोलीच्या घरापासून आलिशान बंगल्यापर्यंतचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची जीवनशैली, कार कलेक्शन, घर आणि एकूण संपत्ती याबद्दल जाणून घेऊया…….
आयपीएल (IPL 2022) मध्ये रोहित शर्माची किंमत…
यावेळी रोहित शर्माचा आयपीएलचा पगार आयपीएलच्या पहिल्या सीझनच्या तुलनेत 5 पटीने वाढला आहे. आयपीएल 2022 मध्ये, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने 16 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. याआधी आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 15 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. रोहित शर्माला यापूर्वी 2008 च्या आयपीएल मालिकेत डेक्कन चार्जर्सने 3 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
रोहित शर्माचे आलिशान घर…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा लहान असताना त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांचे संपूर्ण कुटुंब एका खोलीच्या घरात राहत होते. रोहित शर्मा त्याच्या आजीकडे राहायचा. पण आज रोहित शर्माकडे स्वतःचे आलिशान घर आहे. 2015 मध्ये त्यांनी मुंबईत एक आलिशान डिझायनर घर खरेदी केले.त्यांच्या घराची किंमत जवळपास 30 कोटी रुपये आहे. वरळीतील आहुजा टॉवर्समधील रोहित शर्माचा 4 बीएचके (4 BHK) अपार्टमेंट हा खूप आलिशान आहे. याशिवाय रोहित शर्माकडे अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत.
रोहित शर्मा कार कलेक्शन
रोहित शर्माचे कार कलेक्शन मर्यादित आहे पण त्याच्याकडे जगातील काही सर्वोत्तम कार आहेत. यामध्ये BMW, Audi, Porsche आणि Mercedes Benz यांचा समावेश आहे. रोहित शर्माच्या मर्सिडीजची किंमत सुमारे 88.2 लाख रुपये, बीएमडब्ल्यू सीरिजची कार 59.8 लाख, लॅम्बोर्गिनी सुमारे 3 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे 1.54 कोटी रुपयांची BMW M5, 23 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि 16.20 लाख रुपयांची स्कोडा लॉरा आहे.
रोहित शर्माची कमाई…
रोहित शर्माच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर तो क्रिकेट सामने, आयपीएल सामने, जाहिराती, सोशल मीडिया आणि ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून मोठी कमाई करतो. बीसीसीआय दरवर्षी रोहित शर्माला 7 कोटी रुपये मानधन देते. बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील ग्रेड ए+ गटामध्ये रोहितचा समावेश आहे. रोहित शर्मा महिन्याला 1.2 कोटी रुपये कमावतो. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दरवर्षी 16 कोटींहून अधिक कमावतो.
रोहित शर्माची एकूण संपत्ती…
रोहित शर्मा खूप विलासी जीवन (Luxury Lifestyle) जगत आहे. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माची एकूण संपत्ती 24 मिलियन डॉलर आहे. भारतीय चलनात रोहित शर्माची एकूण संपत्ती 180 कोटी रुपये आहे. गेल्या काही वर्षांत रोहित शर्माच्या कमाईत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.