Cricket World Cup : मला मराठा समाजापेक्षा (maratha reservation) कुणीही मोठं नाही कारण मी या समाजालाच सगळं काही मानतो. असं म्हणत उपस्थितांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आज अश्रू अनावर झाले.
पाणी पिण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने विनंती केली. जी विनंती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मान्य केली आहे. ‘तुम्ही कुणीही हट्ट करु नका, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे’ असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. या दिवशी त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून, त्यांनीआरोग्य तपासणी करून घेण्यास देखील नकार दिला आहे. सध्या संपूर्ण राज्यात मराठा आंदोलनाचे पडसाद दिसून येत आहेत.
दरम्यान, अश्यातच आता आंदोलनाचे हे सावट क्रिकेट विश्वचषक सामान्यांवर (Cricket World Cup) देखील उमटू लागल्याचे दिसून येत आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा (Cricket World Cup) आता रंगतदार वळणावर आली आहे. असं असताना दुसरीकडे, राज्यात मराठा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र होताना दिसत आहे.
त्यामुळे मुंबई पुण्यात होणाऱ्या सामन्यांसाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवत आहे. पुण्यात होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही पोलिसांनी असाच कडा पहारा ठेवला आहे. हा सामना पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक काळे कपडे परिधान करून आले होते.
मात्र पोलीस आणि यंत्रणांनी त्यांना प्रवेश नाकारला. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या क्रीडाप्रेमींचा मात्र हिरमोड झाला आहे. सध्या खबरदारी म्हणून क्रिकेट मैदानात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.