सिडनी – क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला बिग बॅश लीग स्पर्धेतील सिडनी सिक्सर्स संघाला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तब्बल 25 हजार डॉलर (19 लाख रुपूये) दंड केला आहे. या संघाने अधिकृतपणे संघात नसलेल्या एका खेळाडूचा समावेश केल्याने ही कारवाई करण्यात आली.
सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न रेनेगाडेस यांच्यात लढतीत सिडनी सिक्सर्स संघाने जलद गोलंदाज हेले सिल्व्हर-होम्सची निवड केली. काही दिवसांपूर्वी हेले दुखापतीतून बाहेर झाली होती. पण बिग बॅश स्पर्धेतील समितीने तिच्या परतीला मंजूरी दिली नव्हती.
परवानगी शिवाय हेलेचा संघात समावेश केल्याने ती निवड अयोग्य ठरवण्यात आली. यामुळे हेलेला सिडनी सिक्सर्स संघाकडून फलंदाजी करता आली नाही. कारण ही चूक दुसरा डाव सुरू करण्याआधी निश्चित करण्यात आली.