पुणे – अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर स्मृती करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत 2 एन क्रिकेट अकादमी संघाने यंग स्टार क्रिकेट अकादमी संघाचा 39 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा खेळताना 2 एन क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 7 बाद 153 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यंग स्टार क्रिकेट अकादमी संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 114 धावांत संपूष्टात आला.