कोयनानगर – पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवकवाढली आहे. त्यामुळे आज मंगळवारी दि. 11 रोजी रात्री 12 वाजता कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे 1 फुट उचलून नदीपात्रात 3,154 क्युसेक विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. तसेच धरण पायथा विद्युत गृहातूनही 1050 क्युसेक विसर्ग चालू असल्याने नदीपात्रात एकूण 4,204 क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे.