नवी दिल्ली – देशातल्या केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय आणि सीबीएसई बोर्ड या संस्थांमधील 327 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोविडमुळे दगावल्याची माहिती सरकारतर्फे आज संसदेत एका लेखी उत्तरात देण्यात आली.
शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी एका प्रश्नावर ही माहिती दिली. तथापि कोविड ड्युटीच्या काळात त्यांच्यापैकी एकाचेही निधन झालेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या शाळा किंवा शैक्षणिक संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत त्या वगळून अन्य शाळा राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहेत.
शालेय शिक्षण हा विषय केंद्र व राज्य सरकार या दोन्हींच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे अन्य राज्यांच्या शाळांमधील किती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोविडमुळे मृत्यूमुखी पडले त्याची माहिती सादर होऊ शकलेली नाही.