पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आज (दि. 4) राजीनामा दिला. नगरसेविका माया बारणे या थेरगावमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. सहा महिन्यापूर्वीच माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे माया बारणे हे राजीनामा देणार हे निश्चित होते. अखेर आज माया बारणे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.