सातारा – शनिवारी रात्री सातारा येथील खासगी रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार सुरु असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असून उपचारादरम्यान त्याचा स्त्राव तपासणीकरीता खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यात तो करोनाबाधित असल्याचे संबंधित रुगणालयाने कळविले आहे. हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबईवरून आला होता. अशी माहितीही संबंधित रुग्णालयाने दिली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
शनिवारी रात्री उशिरा पुण्यातील एन.सी.सी.एस. यांनी ८९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर कृष्णा मेडिकल कॉलेजने २६ अशा एकूण ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर कळविली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या एकूण ७२७ झाली असून कोरोनातून ४९९ ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये करोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या १९४ इतकी झाली आहे तर ३२ जणांचा मृत्यु झाला आहे.