पुणे – शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच आता ससून रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीये. ससून रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या या ३४ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली असून सदर महिलेला आता आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबतच्या वृत्ताला ससून रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अजय चंदनवाले यांनी देखील दुजोरा दिला आहे.
A 34-year-old nurse working with Pune’s Sassoon Hospital tested positive for #COVID19. She has been shifted to an isolation ward: Dr Ajay Chandanwale, Dean Sassoon Hospital #Maharashtra
— ANI (@ANI) April 14, 2020