नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संकटाच्या वेळी लोकांनी घरीच राहावे व लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केल्याबद्दल भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्याच्या काही काळाआधीच सोनिया गांधींनी आपल्या व्हिडिओ संदेशात लोकांना या संकटात त्यांच्या पक्षाकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.
त्याचबरोबर, लवकरच आत्मविश्वासाने देश या संकटावर मात करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण सर्वजण संपूर्णपणे बंदचे अनुसरण कराल अशी मला आशा आहे; असे त्यांनी आवाहन केले. सर्वांच्या सहकार्याशिवाय ही लढाई जिंकणे शक्य होणार नाही असेही सोनिया गांधी म्हणाल्या.त्यानंतर भाजपचे राष्टीय अध्यक्ष्य जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून सोनिया गांधींचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे कि, आपल्या आरोग्याची काळजी घ्या ! तसेच सोनिया गांधींनी केलेल्या अवाहनचे आभार मानले आहेत.