निमगाव म्हाळुंगीतील कोरोना बाधित इसमाचा मृत्यू

 

शिक्रापूर -निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर येथे एका इसमाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या इसमाच्या घरातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असताना त्या ठिकाणचा प्रथम कोरोना बाधित आढळून आलेल्या इसमाचा आज मृत्यू असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर येथील अठ्ठावन्न वर्षीय जेष्ठ नागरिकाला काही त्रास सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले त्यावेळी ताच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसून येत असल्यामुळे त्याला पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्याची कोरोना तपासणी केल्यानंतर त्या इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला, त्यांनतर ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी व आरोग्य विभागाच्या वतीने सदर इसम राहत असलेला परिसर पूर्णपणे फवारणी करत निर्जंतुकिकरण करत सदर इसमाच्या संपर्कातील चौदा जणांचे स्व्याब तपासणीसाठी घेण्यात आले होते तर तपासणी साठी घेतलेल्या चौदा दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत एकाच घरातील अकरा जणांना कोरोनाची बाधा झाली.

अचानकपणे कोरोणाचा गावामध्ये शिरकाव होऊन एकाच कुटुंबातील अकरा जन बाधित झाले असल्यामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली तर निमगाव म्हाळुंगी येथील सर्व प्रथम मिळून आलेल्या अठ्ठावन्न वर्षीय जेष्ठ नागरिकावर पुणे येथे उपचार सुरु असताना अखेर आज त्या इसमाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.