पिंपरी -करोनाचे बुधवारी (दि. 29) दिवसभरात 83 बाधित रुग्ण आढळले. तर, शहरातील एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे.
शहरात रुग्णालयांमध्ये सध्या 218 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 219 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे. दिवसभरात 5 हजार 146 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. करोनामुक्त झालेल्या 68 रुग्णांना घरी सोडले आहे.
शहरात आत्तापर्यंत 23 लाख 73 हजार 334 रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 78 हजार 906 रुग्ण हे बाधित आढळले. तर, 2 लाख 74 हजार 675 रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 29 लाख 52 हजार 726 जणांना करोनाचे लसीकरण करण्यात आले.