कराड – राज्याच्या अर्थसंकल्पासह व पुरवणी अर्थसंकल्पात स्थानिक आमदारांच्या शिफारशीने विकासकामे मंजूर होत असतात. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारशीने कराड उत्तर मतदारसंघासाठी रस्ते व पूल उभारणीसाठी 26. कोटी 16 लाखांचा निधी आणला आहे. त्याचबरोबर सिमेंटच्या बंधाऱ्यांसाठी 1 कोटी 16 लाखांचा निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर झाला असल्याची माहिती राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी दिली.
तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील यासह अन्य विकासकामांच्या निधीबाबत आम्हीच निधी मिळवला असल्याच्या काही जणांकडून वल्गना करत जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. असे असेल तर सदरचा निधी मिळवण्यासाठी संबंधितांनी काय पाठपुरावा केला. व कोणाकडे निध्ची मागणी केली, याचे पुरावे द्यावेत, असे आव्हानही त्यांनी यावेळी विरोधकांना दिले. कराड येथील त्यांच्या निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मानसिंगराव जगदाळे, प्रशांत यादव उपस्थित होते.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, कोणत्याची विकासकामांसाठी निधी मंजूर होण्यासाठी एक प्रक्रिया असून पुरवणी अर्थसंकल्पात त्या-त्या आमदारांच्या शिफारशीने कामे मंजूर होतात. अजितदादा पवार यांनी उत्तरेतील अशा 29 कामांसाठी 26 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.त्यामध्ये रस्ता रूंदीकरण व सुधारणा कामांसाठी अनुक्रमे मसूर ते शहापूर फाटा रस्त्याच्या चौपदरीसह सुधारणा 2 कोटी 20 लाख, बोरगाव ते किराली रस्ता 3 कोटी.
वाठार ते इंगळे वस्ती रस्ता 3 कोटी, राष्ट्रीय महामार्ग ते पेरले – कृष्णा नदीपर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व सुधारणा 2.50 कोटी, तारगाव पूल ते तारगाव रेल्वे स्टेशन रस्ता 2 कोटी, लाडेगाव ते वांझोळी रस्ता 2.50 कोटी, बोरगाव ते वाघवस्ती रस्ता 1 कोटी 30 लाख, पाटण – मणदुरे – पाल – काशिळ रा. मा. 398 वरील किमी 38.050 ते 38.100 मधील मोठ्या पुलाची पुनर्बांधणीसाठी 2 कोटी, रा. मा. 143 ते अंतवडी पोच रस्ता 30 लाख, यशवंतनगर गाडीतळ ते मसूर-शिरवडे रस्ता 30 लाख, वांग रेठरे ते पाचुंद रस्ता 20 लाख, तासवडे ते वराडे रस्ता 30 लाख, सयापूर जोड रस्ता 25 लाख, करवडी ते आरफळ कॉलनी रस्ता 30 लाख, विरवडे-करवडी रस्त्यावर गणपती मंदिर ते एमएसईबी चौक रस्ता 51 लाख.
पाल – खंडाईत वस्ती – अतित रस्ता 30 लाख, धावरवाडी ते पाल रस्ता 25 लाख, प्रजिमा 60 ते चोरजवाडी-साखरवाडी रस्ता 30 लाख, किवळ ते घोलपवाडी रस्ता 30 लाख, पाडळी ते गायकवाडवाडी रस्ता 30 लाख, पाडळी ते गायकवाडवाडी रस्ता 30 लाख, रा. म. 4 ते कोर्टी ते जुने गावठाण रस्ता 30 लाख, साखरवाडी ते जंगलवाडी रस्ता 30 लाख, अपशिंगे ते नवलेवाडी रस्ता 30 लाख, रा. मा. 142 ते बोरबन रस्ता 20 लाख, रा. मा. 140 ते साप – वेळू जोडरस्ता 20 लाख, रा. मा. 142 ते टकले ऍप्रोच रस्ता 40 लाख, तारगाव ते टकले प्रोच रस्ता 20 लाख, पिंपरी ते सुर्ली रस्ता 20 लाख, मसूर रेल्वे स्टेशन ते कोणेगाव रस्ता डांबरीकरण 2 कोटी असा 26.16 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्याचबरोबर जिल्हा नियोजनमधून किवळ, मांडवे व पाडळी येथे सिमेंट कॉंक्रिटच्या बंधाऱ्यासाठी 1 कोटी 16 लाख रूपयांचा निधीही मंजूर झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासकामांच्या निधीचे पुरावे घेऊन सामोरासमोर या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विकासकामे ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आ. बाळासाहेब पाटील यांच्या मागणीवरून मंजूर केली आहेत.
परंतु, सदरच्या विकासकामांमधील काही कामे आम्हीच मजूर करून आणली असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, हिम्मत असले तर, याबाबत संबंधितांनी मंजूर करून आणलेल्या विकासकामांची यादी व पुरावे कराडच्या दत्त चौकात येवून सदर करावेत, असे आव्हान राष्ट्रवादी युवकचे प्रशांत यादव यांनी विरोधकांना दिले आहे.