पुणे – करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांपैकी 80 टक्के व्यक्तींना 72 तासांमध्ये शोधून काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढणार असून करोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
शहरासह ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. तसेच करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांचीसुद्धा चाचणी करण्यात येत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करणे, त्यांची ओळख पटवणे तसेच अलगीकरण करणे आणि त्यांचा 14 दिवसांपर्यंत पाठपुरावा करणे आदी सूचना दिल्या आहेत.
करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध लवकर लागला तर पुढील संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून या सूचना दिल्या आहेत.