काश्‍मिरात दहशतवादी हल्ल्याचा कट पुण्यातून युवतीसह दोघांना अटक, “एनआयए’च्या स्पेशल कोर्टात हजर केले जाणार

 

पुणे – जम्मू काश्‍मिरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा इसिसचा कट राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उधळला आहे. या प्रकरणात पुण्यातील एका युवतीसह दोन जणांना अटक करण्यात आली. त्यांना दिल्ली येथील एनआयएच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान इसिसची पाळेमुळे शहरापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा येईपर्यंत स्थानिक पोलिसांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही? याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे.

कोढवा परिसरात व्यायामशाळा चालवणारा नबील एस खत्री (वय 27) याला त्याच्या घरातून एनआयएने ताब्यात घेतले. तर येरवड्यातील फुलेनगर येथून सादिया शेख (वय 22) हीलाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर इसिसच्या दहशतवादी विचारांचा प्रसार करणे, भारतात इसिसची केडर तयार करण्यासाठी तरूणअंची भरती करणे याचबरोबर बनावट नावाने सीमकार्ड मिळवून ते इसिसच्या हस्तकांना पुरवणे, स्फोटके बनवणे, आदी कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहेत. सादिया ही इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून 2016मध्ये ताब्यात घेण्यात ाळी होती. तिला काश्‍मिरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून 2018 मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. मात्र अल्पवयीनअसल्याने तिचे समुपदेशन करून तिला सोडण्यात आले होते. ती मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझमच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.