बारा पोलिस बाधीत; तेरा क्वारंटाइन, करोनामुळे जिल्हा पोलीस दल हादरले

सातारा- गेली पाच महिने करोनाच्या काळामध्ये लोकांना धीर देणार्‍या सातारा पोलीस दलाला आज करोनाचा विळखा पडल्याचे समोर आले आहे. वाई पोलीस ठाण्यातील बारा पोलीस कर्मचारी करोना बाधित आले आहेत. तर कराडच्या तेरा पोलीसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

गत महिन्यात शिरवळ चेक पोस्टवर सातारा पोलीस दलातील पहिला कारोना बाधित फौजदार आढळला होता. त्यानंतर भितीचे वातावरण पसरलेल्या पोलीस दलाला शिरवळची साखळी तुटल्याने हायसे वाटले होते. मात्र, रविवारी वाई पोलीस ठाण्यातील एक वाहतूक पोलीस बाधित आल्यानंतर त्यांच्या काही सहकार्‍यांचे करोना चाचणीसाठीचे नमुने घेण्यात आले होते. सोमवारी दिवसभर या अहवालाकडे पोलीस दलाचे लक्ष लागुन राहीले होते.

अखेर सोमवारी रात्री आलेल्या करोना अहवालाने सातारा जिल्हा पोलीस दलाला मोठा हादरा दिला. वाई पोलीस ठाण्यातील तब्बल बारा पोलीस दादा करोना बाधित असल्याचे समोर आले. तसेच येरवडा कारागृहातून एका संशयिताला चौकशीसाठी कराडला आणणारे पोलीस व त्यांच्या संपर्कातील इतर असे एकूण कराड पोलीस ठाण्याचे तेरा पोलिस कर्मचारी क्वारंटाइन केल्याने सोमवार पोलीस दलासाठी घातवार ठरल्याचे बोलले जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.