इंदापूर – पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील युवराज तानाजी गायकवाड यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी तर आकाश पवार यांची ओबीसी विभाग उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
पुणे काँग्रेस भवन येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीचे इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्निल भैय्या सावंत उपस्थित होते.
या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर इंदापूर तालुक्यासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.