सोरतापवाडी – नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ड वर्गातून बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल नायगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती व सदस्य सनी काळभोर , माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी ,नितीन हगवणे , रमेश मेमाणे ,ज्ञानेश्वर शेलार ,नवनाथ गायकवाड ,बापु बबन चौधरी ,उत्तम शेलार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना प्रा.दुर्गाडे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अशिया खंडात नावलौकिक मिळवला आहे . 13 हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी असणारी जिल्हा मध्यवर्ती बँक इथून पुढच्या काळामध्ये खाजगीकरणाची सर्व आव्हाने पेलून पुढे जाईल .
हवेलीतील जेष्ठ नेते सुरेश घुले यांच्या पराभवाचे शल्य सगळ्यांना वाटत असून गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली असल्याची खंत प्रा. दुर्गाडे यांनी व्यक्त केली .