Lok Sabha Election 2024 । मध्य प्रदेशातील महाकौशल भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोनंतर एका दिवसानंतर काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधीही आज निवडणूक रॅलीत गर्जना करणार आहे. मात्र त्यापूर्वीच येथील एका पोस्टरमुळे काँग्रेसला पेच निर्माण झाला होता. राहुल गांधींच्या पोस्टरमध्ये भाजपचे उमेदवार फग्गन सिंग कुलस्ते यांचे फोटो चुकून टाकण्यात आले.
#WATCH | Madhya Pradesh: Before Congress MP, Rahul Gandhi’s address today at the election rally in Dhanora village of Mandla Lok Sabha in favour of Congress candidate Omkar Singh, the flex that was being put up on the main stage had the picture of Union Minister & BJP candidate… pic.twitter.com/I5drf8uJog
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 8, 2024
काँग्रेस नेते राहुल गांधी महाकौशल आणि विंध्य येथील प्रत्येकी एका संसदीय जागेवर जाऊन सभा घेणार आहेत.राहुल गांधी यांची सभा अनुसूचित जातीसाठी (एसटी) राखीव असलेल्या मांडला आणि शहडोल या जागांवर होणार आहे.
तत्पूर्वी या रॅलीच्या पोस्टरमध्ये भाजपचे उमेदवार फग्गनसिंग कुलस्ते यांचा फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, पेच पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो फोटो काढून टाकला. काँग्रेस पक्षाकडून ऐन प्रचारा दरम्यान चूक झाल्यामुळे विरोधकांनी यावरून टीका केली आहे.
बालाघाट लोकसभेची पहिली सभा सिवनी जिल्ह्यातील धानोरा येथे तर दुसरी सभा शहडोल येथे होणार आहे. बालाघाटमधून सम्राट सिंह आणि शहडोलमधून फुंडेलाल मार्को हे काँग्रेसचे उमेदवार आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघ आदिवासीबहुल असून, काँग्रेसला आदिवासी जागांवर मोठ्या आशा आहेत. प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असणार आहे.
या पोस्टरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. दुसरीकडे, पेच पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही वेळातच या पोस्टरवरून फग्गनसिंग कुलस्ते यांचा फोटो काढून टाकला. त्यांनी फग्गन सिंगचा फोटो कव्हर केला.